तांब्या-पितळेची भांडी चमकवण्यासाठी सोप्या अन् घरगुती टिप्स

घरातील देवपूजेची भांडी असोत किंवा स्वयंपाकघरातील तांब्या-पितळेची भांडी काही दिवसांतच त्यांचा चकचकीतपणा कमी होऊन ती काळी हिरवी पडतात. ही भांडी चकचकीत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी महागड्या पावडरऐवजी तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करू शकता. आजच्या बातमीत याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात.

लिंबू आणि मीठ

अर्ध्या कापलेल्या लिंबूवर थोडं जाडं मीठ टाका आणि ते तांब्या-पितळेच्या भांड्यावर चोळा. लिंबामधील सिट्रिक ॲसिड आणि मीठामुळे भांड्यांवरील काळेपणा अवघ्या काही सेकंदांत दूर होतो.

चिंच आणि गरम पाणी

थोडी चिंच गरम पाण्यात 15 मिनिटे भिजत ठेवा. या चिंचेचा कोळ भांड्यांवर व्यवस्थित लावा आणि 5 मिनिटांनी साध्या कपड्याने घासून धुवून टाका.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

एका वाटीत बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट भांड्यांवर लावून 10 मिनिटे ठेवा आणि नंतर मऊ स्क्रबरने घासून कोमट पाण्याने धुवा.

टोमॅटो केचप

टोमॅटो केचपमध्ये असलेले ॲसिड तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी खूप प्रभावी असते. केचप भांड्यावर लावून काही मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसून धुवा.

भांडी धुतल्यानंतर ती कोरड्या अन् मऊ कपड्याने लगेच पुसून वाळवा. भांड्यांवर पाण्याचे थेंब राहिल्यास त्यावर पुन्हा डाग पडू शकतात.

हेही वाचा – लिव्हिंग रूम दिसेल आलिशान, ट्राय करा हॅंगिंग ट्री पॉट्स

Comments are closed.