श्रीनितीसाठी दुहेरी सुवर्ण
वृत्तसंस्था, बेंगळूर
शनिवारी येथे झालेल्या कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेच्या विश्व कनिष्ठांच्या जे-30 बेंगळूर टेनिस स्पर्धेत कर्नाटकाच्या स्थानिक श्रीनिती चौधरीने मुलींच्या एकेरी आणि दुहेरीतील विजेतेपद पटकावून दुहेरी सुवर्णपदकाची मानकरी ठरली. या स्पर्धेत फझलने मुलांच्या एकेरीतील सुवर्णपदक मिळविले.
मुलींच्या एकेरीतील खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात 15 वर्षीय श्रीनितीने कर्नाटकाच्या आहिदा सिंगचा 6-4, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. त्यानंतर महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात श्रीनिधी आणि तिची साथिदार रिद्धी शिंदे यांनी झोहा कुरेशी व दिप्ती व्यंकटेशन यांचा 4-6, 6-2, 13-11 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. 6 व्या मानांकित फझल अली मीरने मुलांच्या एकेरीतील विजेतेपद पटकाविताना अमेरिकेच्या नियांत बद्रीनारायणचा 6-4, 4-6, 2-0 असा पराभव केला. नियांतने दुखापतीमुळे हा सामना अर्धवट सोडला. चुका लक्षवर्धन आणि पार्थिव नेलागुंडला या जोडीने मुलांच्या दुहेरीतील विजेतेपद पटकाविताना अंतिम सामन्यात नितीनबरात व मिश्रा यांचा 6-7 (3-7), 7-6 (7-3), 10-4 असा पराभव केला.
Comments are closed.