राजापुरातील तीन हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित; शिवसेना आक्रमक
आंबा व काजू नुकसान भरपाईचा रक्कम राजापूर तालुक्यातील तीन हजारहून अधिक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. नुकसान भरपाईची ही रक्कम तातडीने अदा करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने राजापूर तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
शासनाने दोन ते तीन महिन्यांपूर्वी आंबा व काजू नुकसान भरपाई जाहीर केली आहे. त्या साठी लागणारे संबंधित शेतकऱ्यांचे लागवडीचे क्षेत्राचे सात-बारा उतारे, बँक पासबुक, फार्मर आयडी व इतर कागदपत्रे कृषी अधिकारी मार्फत घेण्यात आली. तसेच त्या साठी आवश्यक नुकसान क्षेत्राची केवायसी सुद्धा शेतकऱ्यांकडून करून घेण्यात आली. प्रायोगिक तत्वावर पहिल्या शंभर शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले मात्र तीन हजारांहून अधिक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेनेचे राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, माजी सभापती अभिजीत तेली, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी संतोष हातणकर, गणपत मोंडे, संजय पेडणेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.