श्रीलंकेचा रुमेश थरंगा भालाफेकसम्राट; नीरजच्या अनुपस्थितीत जिंकला डायमंड लीगचा मुकुट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन प्रयत्न फिके पडले; पण तिसऱया फेकीत रुमेश थरंगाने असा भाला फेकला की, प्रतिस्पर्ध्यांची सारी गणितेच उधळली. 89.04 मीटरच्या भेदक फेकीसह श्रीलंकेच्या 23 वर्षीय रुमेश थरंगाने डायमंड लीग फायनलचा पुरुष भालाफेकीचा किताब पटकावत इतिहास घडवला. श्रीलंकेकडून हा प्रतिष्ठsचा किताब जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्याने हा किताब हिंदुस्थानचा स्टार खेळाडू नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत जिंकला.

सुरुवातीच्या दोन फेऱयांत 80.42 आणि 79.73 मीटरवर समाधान मानावे लागलेल्या रुमेशने तिसऱ्या प्रयत्नात थेट 89.04 मीटरचा विजयी वार केला. पोलंडच्या डेव्हिड वेग्नरने 87.47 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम फेक करत कडवी झुंज दिली; मात्र रुमेशचा झंझावात रोखणे त्याला जमले नाही. केशॉर्न वॉलकॉट 83.99 मीटरसह तिसरा ठरला. यंदाच्या मोसमात रुमेशने तब्बल 92.62 मीटरचा श्रीलंकन राष्ट्रीय विक्रम नोंदवला असून, तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

Comments are closed.