राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आर. सरथ यांचे निधन – Tezzbuzz
आर. सरथ हे एक लोकप्रिय मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रख्यात चित्रपट निर्माते, पटकथा लेखक आणि सांस्कृतिक प्रशासक होते. त्यांच्या बाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. आर. सरथ यांचे सोमवारी, 7 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे निधन झाले. त्याचे वय सध्या 65 होते आणि बऱ्याच काळापासुन ते मुत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत होते. आणि त्याच्यावर केआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते.
आर. सरथ हे एक उत्तम दिग्गर्शक होते. त्यानी 2000 साली सयन्नम या चित्रपटातुन दिग्दर्शन आणि पटकथा लेखन यात पदार्पण केले. हा चित्रपट त्यांच्या संपुर्ण कारकिर्दितील महत्वाचा भाग आहे. कारण या चित्रपटाला केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. म्युनिक तसेच आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवासह अनेक आंतरराष्ट्रिय महोत्सवांमध्ये तो प्रदर्शित झाला होता.
त्यानंतर, सारथ (sarath)यांनी ‘सिथी’, ‘शीलवती’, ‘द डिझायर: अ जर्नी ऑफ अ वुमन’ आणि ‘पॅराडाईज’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या चित्रपटांनी सामाजिक समस्या आणि मानवी भावनांवर प्रकाश टाकला.
आर. सरथ यांनी त्याच्या कारकिर्दित अनेक सामाजीक कामासाठीही हातभार लावला आहे. त्याच्या जाण्याने त्याचे अनेक चाहते दुखावले असुन ते हळहळ व्यक्त करत आहेत. तसेच त्याच्या जाण्याने चित्रपटसृष्टीच खुप मोठं नुकसान झालं आहे.
हेही वाचा
Comments are closed.