पांढरे कपडे धुताना टाळाव्यात या चुका
पांढरे कपडे घालायला सगळ्यांनाच आवडतात कारण ते दिसायला ऐटबाज आणि आकर्षक दिसतात. पण पांढऱ्या कपड्यांची खरी अडचण ते धुताना येते. सतत वापरल्यास काही वेळाने त्यांचा ब्राइटपणा कमी होतो आणि ते पिवळसर दिसू लागतात. जर तुम्हालाही तुमचे पांढरे कपडे दीर्घकाळ चमकत ठेवायचे असतील तर कपडे धुताना काय लक्षात घ्यायला हवं हे जाणून घेऊयात.
पांढरे कपडे वेगळे धुवावेत
अनेकदा आपण इतर रंगांच्या कपड्यांसोबतच पांढरे कपडे धुवायला टाकतो. रंगीत कपड्यांचा रंग थेट निघत नसला तरीही त्याचा हलका थर किंवा पाणी पांढऱ्या कपड्यांवर परिणाम करतो, ज्यामुळे पांढरा रंग पडतो. म्हणूनच पांढरे कपडे नेहमी वेगळे धुवावेत.
डाग पडल्यास त्वरित स्वच्छ करा
कपड्यांवर चहा, भाजी किंवा घामाचे डाग पडल्यास ते सुकू देऊ नयेत. डाग जितका जुना होईल तितका तो कपड्याच्या धाग्यांमध्ये घट्ट बसतो. त्यामुळे एखाद डाग लागल्यास त्यावर लिंबू, बेकिंग सोडा लावून लगेच धुवून टाका.
ब्लीच वापरणे टाळा
अनेक जण पांढऱ्या कपड्यांची चमक परत आणण्यासाठी केमिकल ब्लीचचा वारंवार वापर करतात. परंतु अति ब्लीचमुळे कपड्याचे धागे कमकुवत होतात आणि काही काळाने कपडे पिवळे पडू लागतात.
कपडे उलटे करून धुवा
कपडे धुताना ते उलटेकरून धुण्याची सवय ठेवा. यामुळे कापडाचा दर्जा टिकून राहतो.
कोमट पाण्याचा वापर
पांढऱ्या कपड्यांवरील मळ आणि तेलकटपणा काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करणे सुरक्षित असते.
हेही वाचा – 2026 मध्ये ग्रोसरी बास्केटमध्ये बदल; चिप्सच्या जागी आले हे स्नॅक्स
Comments are closed.