गुरूशिवाय खेळणार अलिशा चौधरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पदकाची दावेदार आणि जूनमध्ये आशियाई चॅम्पियन ठरलेली हिंदुस्थानची कराटेपटू अलिशा चौधरीला प्रशिक्षकाशिवायच आशियाई स्पर्धेत उतरावे लागणार आहे. अलिशा 55 किलो आणि चेतन भट्ट 84 किलो वजनी गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सामन्यादरम्यान खेळाडूवर अन्याय झाल्यास प्रशिक्षक रिह्यू मागू शकतो. मात्र, मॅनेजरला मॅटजवळ प्रशिक्षक म्हणून बसण्याची परवानगी नसते. अलिशाने आपले प्रशिक्षक विकास यांना सोबत पाठवण्याची मागणी ऑलिम्पिक संघटनेकडे केली आहे.

Comments are closed.