भारताचा नकाशा दाखवला चुकीचा! अफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे टी20 मालिकेआधी नको ते घडलं?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तान भुषवणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच भारतीय संघ आपल्याच देशात पाहुणा म्हणून खेळणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका दिल्लीमध्ये खेळली जाणार आहे, मात्र अफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे त्यांनी पाकिस्तानसोबत एका नव्या राजकिय वादाला सुरूवात केली आहे.
या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी बनवलेल्या एका व्हिडिओमध्ये अफगाण बोर्डाने दाखवेल्या भारताच्या नकाशावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) नाराजी व्यक्त केली आहे.
टी 20 मालिकेची सुरूवात 13 सप्टेंबरपासून होणार आहे. हे तिन्ही सामने अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेच्या प्रमोशनाचा व्हिडिओ अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) रिलीज केला. यामध्ये दोन्ही देशांचा वारसा, विशेष गोष्टी आणि ऐतिहासिक शहरांची काही दृश्ये दाखवली आहेत.
एसीबीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “एक अशी मालिका जिची संपूर्ण देशाला आतुरतेने प्रतीक्षा आहे. एक अशी मालिका जी पुन्हा एकदा अशा दोन देशांना एकत्र आणेल ज्यांचा इतिहास आणि संस्कृती खोलवर रुजलेली आहे आणि ज्यांना या खेळाची समान ओढ आहे. हे केवळ सामने नाहीत; तर हा जोश, उत्साह आणि विशेष महत्त्व असलेला असा मुकाबला आहे.”
व्हिडिओच्या शेवटच्या भागात अफगाणिस्तान आणि त्यानंतर भारताचा नकाशा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
झाले असे की, या व्हिडिओमध्ये भारताचा नकाशा दोन वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्यात आला आहे. पहिल्या भारतीय नकाशात संपूर्ण जम्मू आणि काश्मीर आणि लडाख भारताचा भाग म्हणून दाखवले आहे. त्याच्या पुढच्याच क्षणी नकाशातून पाकिस्तानव्याप्त काश्मीर काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळेच वाद निर्माण झाला आहे.
सुरूवातीला दाखवलेला संपूर्ण नकाशादेखील जम्मू-काश्मीर, लडाख आणि पाकव्याप्त काश्मीर या तीन भागांमध्ये विभागलेला आहे.
हा व्हिडओ पोस्ट करून 24 तासांपेक्षा अधिक वेळ झाला असूनही एसीबीने तो डिलीट केलेला नाही. आता यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) काय ऍक्शन घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Comments are closed.