मोहन नाखवा यांना आदरांजली
फ्रेंडशिप क्रिकेट क्लबच्या वतीने श्री आनंद भारती समाजाच्या सभागृहात मोहन नाखवा यांना शोकसभेत आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत ऍड. रमाकांत कोळी, जगदीश कोळी, विजय नाखवा, प्रफुल्ल नाखवा आणि गिरीश तांडेल यांनी नाखवा यांच्या क्रिकेटमधील योगदानासह त्यांच्या प्रेमळ स्वभावाच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.
Comments are closed.