Ratnagiri News – रिक्षांना सीएनजी पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक संघटना आक्रमक

चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथे असलेल्या गहानगर गॅस स्टेशनगधून येत्या १० सप्टेंबर २०२६ पासून रिक्षा व्यावसायिकांना सीएनजी गॅसचा पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघटना आक्रमक झाली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असताना वाहतुकीवरील ताण वाढणार असल्याने रिक्षाचालकांना गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

याबाबत संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी याना निवेदन देण्यात आले. रिक्षाचालक हे सीएनजी खरेदी करताना ग्राहक असल्याने त्यांना नियमित व योग्य प्रकारे सेवा गिळण्याचा अधिकार असल्याचे संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. गणेशोत्सवासाठी पुढील काही दिवसांत कोकणात लाखो चाकरमानी दाखल होणार आहेत. या काळात रस्ते वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो. अशा परिस्थितीत रिक्षा व्यवसायिकांना सीएनजी पुरवठा बंद झाल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शिवाजीनगर येथील संबंधित गॅस स्टेशनमध्ये रिक्षाचालकांना नियमित आणि योग्य दरात सीएनजी उपलब्ध करून द्यावा, तसेच गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही परिस्थितीत गॅस पुरवठा बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे.दरम्यान, संबंधित गॅस स्टेशनमधून सीएनजी वितरण बंद करण्यात आल्यास सर्व रिक्षा व्यावसायिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडप्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. अशा परिस्थितीत निर्माग होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित गॅस स्टेशनच्या व्यवस्थापनाची राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवात रिक्षाचालकांचा गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघाच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत रिक्षाचालकांना सुरळीत व मुबलक गॅस पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महानगर गॅस कंपनीकडे निवेदन देण्यात आले आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले, उपाध्यक्ष संजय जोशी, सचिव प्रशांत गोरिवले, तसेच रवींद्र घाडगे, सुनात सावर्डेकर, राजू, गुट्टेकर, निलेश गोरिवले, अनंत मोरे, रामदास भोजने, भाऊ मोरे, प्रशांत कदम, सचिन गोरिवले, सचिन शिंदे, गणेश खेडेकर, आबा डोंगरे, अखिल जुवेकर, विनोद डोंगरे, संजय सोलकर, प्रभाकर बागवे, संतोष घाणेकर यांच्यासह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते.

Comments are closed.