Asia Cup 2026 मध्ये ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान आणि आयसीसी क्रमवारीत वर्चस्व; दीप्ती शर्माची मोठी झेप
Asia Cup 2026 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत दमदार कागमगिरी केली आहे. तीन सामने जिंकत ग्रुप ए मध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचा परिणाम ICC च्या ताज्या टी-20 क्रमवारीत पाहायला मिळतोय. अष्टपैलू दीप्ती शर्माने दोन स्थानांची घसघशीत मजल मारत थेट सहावे स्थान पटकावले आहे.
दीप्ती शर्माने तीन्ही सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवून दिली आहे. आपल्या फिरकीच्या जाळ्यात तिने 8 फलंदाजांना अडकवलं. दुसरीकडे, सात विकेट्सच्या जोरावर प्रतिभावान फिरकीपटू एन श्री चरणी हिने आपले नंबर-वनचे सर्वोच्च स्थान अत्यंत मजबूत राखले आहे. विशेष म्हणजे, श्री चरणी आणि दीप्ति शर्मा यांच्यात अवघ्या 70 रेटिंग पॉइन्टचे अंतर असून, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन दुसऱ्या तर चार्ली डीन तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. पाकिस्तानच्या नशरा संधूने उत्कृष्ट कामगिरी करूनही तिला एका स्थानाचे नुकसान सहन करावे लागले असून ती आठव्या स्थानी पोहोचली आहे.
फलंदाजीच्या विभागातही टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. उपकर्णधार स्मृती मनधाना पाचव्या स्थानावर कायम असून, तिने नुकत्याच हॉंगकॉंगविरुद्ध शतकी खेळी करताना मिताली राजचा विक्रम मोडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशासाठी सर्वाधिक धावा करण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे. मनधनासह टीम इंडियाची आक्रमक फलंदाज शेफाली वर्मा सातव्या आणि कर्णधार हरमनप्रीत कौर दहाव्या स्थानी विराजमान आहेत.
Comments are closed.