भातशेती बहरली! संगमेश्वर तालुक्यात भातपिकाला पोषक वातावरण
यंदा पावसाने भातशेतीला चांगले पाठबळ दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भातशेतीची रोपे जमिनीत नीट रुजून जोमाने वर आल्यानंतर आता भातशेती बहरू लागली आहे. त्यामुळे यंदा भाताचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यावर्षी पाऊस वेळेवर आणि पोषक प्रमाणात झाल्याने भातलावणीसह इतर शेतीची कामेही सुरळीतपणे पार पडली. पावसाची संतुलित हजेरी राहिल्याने भातपिकाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अनेक भागांत भाताची रोपे जोमाने वाढत असून भातशेती बहरली.
मात्र, लावणीच्या कालावधीत तालुक्यातील काही भागांत पावस झालाच नाही.त्यामुळे काही ठिकाणी लावणीची प्रक्रिया काहीशी मागे-पुढे झाल्याचे दिसून येत आहे. तरीही त्यानंतर झालेल्या पावसामुळे पिकाला आवश्यक ओलावा मिळाल्याने भातशेतीची वाढ समाधानकारक असल्याचे चित्र आहे.येत्या काळात पावसाची अशीच साथ राहिल्यास भाताचे पीक बहरण्यास मदत होऊन शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम समाधानकारक जाण्याची अपेक्षा आहे.
Comments are closed.