कशी असावीत उशांची कव्हर्स?

घराच्या सौंदर्यात आणि शांत झोपेत उशांच्या कव्हर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. बऱ्याचदा आपण केवळ रंगांवरून उशांची कव्हर्स निवडतो, मात्र कपड्याची गुणवत्ता पाहत नाही. केवळ डिझाईन पाहून खरेदी केली जाते. परंतू यामुळे आरोग्य आणि त्वचेवर याचा परिणाम होऊ शकतो. आज आपण उशांची कव्हर्स कशी असावीत यासदंर्भातील काही टिप्स पाहूयात.

कापडाची गुणवत्ता

नेहमी कॉटन, सॅटिन, सिल्क किंवा लिनन अशा मऊ कापडाची कव्हर्स खरेदी करावीत.  कॉटनची कव्हर्स घाम शोषून घेतात तर सिल्कच्या कव्हर्समुळे केसांचे आणि त्वचेचे नुकसान होत नाही.

तंदुरुस्त फिटिंग

उशीच्या आकारापेक्षा कव्हर खूप लहान किंवा मोठे नसावे. योग्य फिटिंग असणारी आणि मागे जिप किंवा बटण असलेली कव्हर्स वापरावीत, जेणेकरून उशी वारंवार बाहेर येत नाही.

रंग आणि डिझाईन

सोफ्यासाठी ब्राईट आणि एथनिक प्रिंट्स असणारी कव्हर्स उठून दिसतात. मात्र, बेडरूममधील उशांसाठी हलके, पेस्टल रंग  उदा. राखाडी, आकाशी, गुलाबी निवडावेत.

काळजी

उशांच्या कव्हर्सवर धूळ, तेल आणि बॅक्टेरिया जमा होतात. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा ती स्वच्छ धुणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

हेही वाचा – पांढरे कपडे धुताना टाळाव्यात या चुका

Comments are closed.