डासांच्या मेंदूतील गूढतेचा अभ्यास करणे
मच्छर कोणाला चावणार, कुणाला सोडणार?
एकाच ठिकाणी अनेक लोक बसलेले असतात, तरीही मच्छर एखाद्या व्यक्तीला अधिक चावतात आणि इतरांना कमी. अखेर असे का घडते? मच्छर स्वत:ची शिकार कसे निवडतात? माणसाच्या शरीराचा गंध मच्छराला एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित करतात का? आयआयटी कानपूरचे वैज्ञानिक आता याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मच्छराच्या मेंदूचे अध्ययन करत आहेत.
हे संशोधन आयआयटी कानपूरच्या मेहता फॅमिली सेंटर फॉर इंजिनियरिंग इन मेडिसीनमधील प्राध्यापक नितिन गुप्ता यांच्या लॅबमध्ये होतेये. मच्छर माणसाचा गंध कसा ओळखतात, ही माहिती त्याच्या मेंदूपर्यंत कशी पोहोचते आणि त्यानंतर मच्छर कुठल्याही माणसाकडे जाण्याचा निर्णय कसा घेतात हे समजून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत.
या संशोधनात खासकरून एडिस एग्प्याटी मच्छरावर लक्ष दिले आहेत. हाच मच्छर डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारखे आजार फैलावण्यास मोठी भूमिका बजावतो. काही लोकांकडे मच्छर अधिक का जातात आणि काही लोकांपासून दूर का राहतात हे जाणून घेण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे.
माणसाचा गंध कसा ओळखतात?
मच्छर माणसाला शोधण्यासाठी शरीरातून निघणारा गंध आणि इतर संकेतांचा वापर करतात. यात घामातून निघणारे रसायन आणि त्वचेवर राहणाऱ्या छोट्या छोट्या जीवांपासुन तयार होणारे रसायनही सामील असू शकते. प्रत्येक मानवी शरीराचा गंध वेगळा असतो. याचमुळे मच्छर काही लोकांकडे अधिक आकर्षित होत असण्याची शक्यता आहे.
कोणता गंध मच्छराला माणसांकडे खेचतो आणि कोणता गंध त्याला दूर ठेवतो हे समजून घेण्याची इच्छा आयआयटी कानपूरच्या टीमची आहे. मच्छरच्या शरीरावरील खास सेंसर आसपासच्या गंधाला ओळखतात, यानंतर त्याची माहिती मच्छराच्या मेंदूपर्यंत पोहोचते. वैज्ञानिक या पूर्ण प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मच्छराच्या मेंदूत काय घडते?
कोणता गंध मच्छराच्या मेंदूला समजतो आणि मग तो काय करतो हे जाणण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील ओत. याकरता वैज्ञानिक मच्छराच्या मेंदूच्या अशा हिस्स्यांचे अध्ययन करत ओत, जे गंधाशी निगडित माहिती समजतात. या माहितीनतंर मच्छराच्या वर्तनात कोणता बदल होतो हे देखील वैज्ञानिक पाहत आहेत.
संशोधनात सीआरआयएसपीआर-सीएएस9 यासारख्या जेनेटिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वैज्ञानिक मच्छराच्या काही जीनमध्ये बदल करत हे पाहू शकतात की त्याचा प्रभाव मच्छराच्या गंध ओळखण्यावर अन् त्याच्या वर्तनावर काय पडतो.
रक्तप्राशनानंतर बदल
मादी मच्छरामध्ये रक्तप्राशनानंतर त्याच्या वर्तनात कोणता बदल घडतो हे देखील संशोधनात पाहिले जातेय. मादी मच्छराला अंडी देण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते. रक्तप्राशनानंतर तिची गरज बदलते. ती माणसाला शोधण्याऐवजी अंडी देण्यासाठी योग्य ठिकाणी शोधण्यावर लक्ष केंद्रीत करते. रक्त पिल्यावर मच्छराच्या मेंदूत कोणते बदल होतात आणि त्याच्या वर्तनात हा बदल कसा होतो हे शोधण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत.
डेंग्यू रोखण्यास मदत
या संशोधनामुळे पुढील काळात मच्छरांना रोखण्याच्या नव्या पद्धती मिळू शकतात. मच्छर माणसाला शोधण्यासाठी कोणत्या गंध अन् संकेतांचा वापर करतात हे वैज्ञानिकांना कळल्यास मच्छरांना रोखण्याच्या किंवा बदलण्याच्या पद्धती तयार केल्या जाऊ शकतात. मच्छराला केवळ मारणे किंवा पळवून लावण्याऐवजी माणसाला शोधण्याच्या त्याच्या व्यवस्थेलाच लक्ष्य केले जाऊ शकते. यामुळे मच्छराचा चावा आणि त्यामुळे फैलावणाऱ्या आजारांना कमी करण्यास मदत मिळू शकते.
Comments are closed.