लिव्हिंग रूमला द्या रॉयल लूक, लावा अँटीक घड्याळ
घरातील लिव्हिंग रूम सुंदर आणि आकर्षक दिसावी असं प्रत्येकाला वाटतं. घर सजवण्यासाठी आपण अनेक महागड्या वस्तू घेतो, पण एका साध्या आणि जुन्या पद्धतीच्या अँटीक वॉल क्लॉकमुळेही घराचा लूक पूर्णपणे बदलू शकतो. सध्या घराला क्लासिक आणि रॉयल टच देण्यासाठी अशी विंटेज घड्याळे खूप पसंत केली जात आहेत.
घड्याळ कसे निवडावे?
लिव्हिंग रूमसाठी लाकडी चौकटीची, पितळी किंवा धातूची पेंडुलम असलेली घड्याळे खूप छान दिसतात. तुमच्या भिंतीचा रंग जर पांढरा किंवा फिकट असेल तर त्यावर गडद लाकडी रंगाचे किंवा मेटॅलिक फिनिश असलेले मोठे घड्याळ खूप उठून दिसते.

मुख्य भिंतीवर लावा – सोफा सेटच्या मागे असलेल्या भिंतीवर मध्यभागी मोठे अँटीक घड्याळ लावा. यामुळे खोलीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष लगेच तिथे जाते.
फोटो फ्रेम्सचा वापर – घड्याळाच्या आजूबाजूला काही जुने फॅमिली फोटो किंवा छोट्या फ्रेम्स लावून तुम्ही भिंत सजवू शकता.
लाईट लावा – घड्याळाचे डिझाईन स्पष्ट दिसावे यासाठी त्यावर हलका वॉर्म लाईट किंवा फोकस लाईट टाकू शकता.
घड्याळ हे केवळ वेळ पाहण्यासाठी नसून तो घराच्या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. फार जास्त खर्च न करता फक्त एका मोठ्या आणि सुंदर अँटीक घड्याळाच्या मदतीने तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमला एक नवा लूक देऊ शकता.
हेही वाचा – 80s लूकसाठी Ai वर फोटो टाकताय? सावधान! एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान
Comments are closed.