ब्रेकिंग! हर्षित राणा अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेबरोबर एशियन गेम्समधूनही बाहेर, BCCI ने रिप्लेसमेंट केली जाहीर

वेगवान गोलंदाज हर्षित राणा आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याचबरोबर तो आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games) यामध्येही खेळणार नाही. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरूवारी (10 ऑगस्ट) त्याची रिप्लेसमेंट जाहीर केली आहे.

भारतीय पुरुष निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी आणि 2026 च्या आशियाई खेळांसाठी भारतीय संघात हर्षित राणाच्या जागी यश ठाकूरला स्थान दिले आहे.

बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे पुनर्वसनादरम्यान त्या वेगवान गोलंदाजाची प्रगती चांगली होत होती. ७7 सप्टेंबर रोजी सामन्याच्या सरावादरम्यान गोलंदाजी करताना त्याच्या रेक्टस फेमोरिस स्नायूला दुखापत झाली आणि त्यानंतर हर्षितला संघाबाहेर करण्यात आले आहे.

विदर्भाचा 27 वर्षीय वेगवान गोलंदाज यशने नुकतेच जुलैमध्ये भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने दोन सामने खेळून चार बळी घेतले. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 50 सामन्यांमध्ये 7.04च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 81 विकेट्स घेतल्या आहेत. (Yash Thakur replaces Harshit Rana in India’s T20Is squads for Afghanistan T20Is & Asian Games 2026)

Comments are closed.