कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची कमतरता कशी ओळखावी?

शरीर तंदुरूस्त आणि हाडे मजबूत राहण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटामिन डी हे दोन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. कॅल्शियममुळे हाडांना ताकद मिळते तर व्हिटामिन डी हे पदार्थांतील कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी उपयुक्त असते. परंतु, सध्याची लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेकांना विशेषतः महिलांमध्ये यांची कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे आज आपण शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता कशी ओळखावी यासंदर्भातील टिप्स पाहूयात.

सतत होणारी अंगदुखी आणि थकवा

थोडेसे काम केल्यानंतरही प्रचंड थकवा जाणवणे, पाय आणि पाठीत सतत वेदना होणे हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे प्रमुख लक्षण आहे.

हाडे आणि स्नायूंमध्ये गोळे येणे

रात्री झोपताना किंवा चालताना पायांच्या स्नायूंमध्ये अचानक गोळे  येणे किंवा सांधेदुखीचा त्रास होणे हे शरीरात कॅल्शियम कमी असल्याचे संकेत आहेत.

कमकुवत नखे आणि केस गळणे

नखे वारंवार तुटणे, कोरडी पडणे आणि जास्त प्रमाणात केस गळू लागणे यामागे कॅल्शियमची कमतरता असू शकते.

दात कमकुवत होणे

दातांमध्ये कीड लागणे किंवा दात हळूहळू कमकुवत होणे.

काय करावे उपाय?

ही समस्या दूर करण्यासाठी दररोज सकाळी 15  ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे, कारण सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. याशिवाय आहारात दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, तीळ आणि नाचणी यांचा समावेश करावा. खूप जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आहारात बदल करावेत.

हेही वाचा – Body Clock: असे ओळखा स्वतःचे ‘बॉडी क्लॉक’

Comments are closed.