मराठवाडा पेटला तर त्याचा वणवा दिल्लीपर्यंत जाईल, नामर्द सरकारला आता धडा शिकविण्याची वेळ – खासदार संजय राऊत
मराठवाड्याला ऐतिहासिक संघर्षाची परंपरा आहे. आता मराठवाड्यात ठिंणगी पडली असून त्याचा वणवा दिल्लीपर्यंत जाणार. थापा मारणार्या सरकारला आता धडा शिकविण्याची वेळ आली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आहे. पुढचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणारे असेल, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज येथे दिला.
‘तुमसे ना हो पायेगा’ या सबंध मराठवाड्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज नांदेड येथे ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतानी संजय राऊत म्हणाले, मराठवाड्याला ऐतिहासिक संघर्षाची परंपरा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र मराठवाडा एक वर्ष उशिरा स्वतंत्र झाला. रझाकाराच्या जुलमी अत्याचाराने मराठवाडा त्रस्त झाला होता. त्यावेळी संघर्षाची ठिणगी पेटली. मोठे आंदोलन उभे राहिले, त्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला.
मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात घोषणांचा पाऊस पाडून मिंद्यांनी टाळ्या मिळविल्या मात्र यातील घोषणांचा पत्ताच नाही, शेतकरी, युवक, महिला, बेरोजगार यांच्यासाठी घोषणा होवूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणूनच ‘तुमसे ना हो पायेगा’ याचा अर्थ हे सरकार नामर्द आहे. सरकार नालायक आहे. लोकांनी तुम्हाला त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बसविले आहे. मात्र हे सरकार मेले आहे. हे सरकार म्हणजे डेडबॉडी आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या तेरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र संवेदना नसलेल्या या सरकारने आता चर्चा नाही, असे उर्मट उत्तर दिले. तर राज्याचे उपमुख्यमंत्री हे इंग्लंडला गेले. जनतेच्या जखमेवर मीठ चोळणार्या या सरकारला शेतकरी, बेरोजगार, युवक धडा शिकवेल आणि हा पेटलेला वणवा याची झळ दिल्लीपर्यंत जाईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
महाराष्ट्रात एकच मर्द मुख्यमंत्री मिळाला ज्यांनी शेतकरी, गोरगरीब, कोरोनाग्रस्त नागरिकांना न्याय दिला. फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा केली मात्र ती फसवी असल्याचे आता सिध्द होत आहे. अयोध्येतील मंदिरात भाजपाच्याच मंडळींनी चोर्या केल्या, रामाचे अलंकार चोरले, पादुका चोरल्या, सितामाईचे दागिणे चोरले, हे दरोडेखोरांचे सरकार आहे, असा घणाघात त्यांनी केला. अशोक चव्हाण भाजपात गेले, आता मोदीकडे जावून मराठवाड्याच्या शेतकर्यांना त्यांनी न्याय द्यावा, असा टोलाही त्यांनी हाणला. मराठवाड्यातील खदखद आत बाहेर पडत आहे, दुष्काळाने मराठवाडा त्रस्त आहे, सिंचनाच्या घोषणा कागदावरच आहेत, घोषणा केलेले प्रकल्प बस्त्यात बांधून ठेवले आहेत त्यामुळेच आता हे आंदोलन उग्र स्वरुप निर्माण करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणाचा जाहीर निषेध करत सरकारवर घणाघाती टिका केली. मराठवाड्याचे भगिरथ पुत्र शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यातील सिंचनासह विविध प्रश्नांचा उकल करत न्याय दिला, सिंचनाखाली शेकडो क्षेत्र आणले, मात्र त्यांच्या पुत्राने त्यांचे नाव धुळीस मिळविले. घोषणांचा नुसता पाऊस पाडून किमान नांदेडमधील प्रश्न त्यांनी सोडवायला हवे होते आज रिव्हर प्रâंट गोदावरीचा प्रकल्प सुरू आहे का हे बघायला गेलो, मात्र त्याचे अंदाजपत्रकच तयार झाले नाही हाच तुमचा विकास आहे का, लेंडी धरणाचे काय झाले, बाभळी धरणाचा प्रश्न तसाच आहे हे प्रश्न न सोडवता हिंदू खतरे मे है म्हणत जनतेला घाबरवले जात आहे, भाजपरुपी रझाकारी हे सरकार आता घालावयाचे असून, हे सरकार हाकलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आज राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना गल्लीबोळात दहीहंड्या फोडायची वेळ आली आहे, असा घणाघातही दानवे यांनी चव्हाणांवर केला. शेतकर्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत, उद्योगांच्या नुसत्या घोषणा झाल्या, ४६ हजार कोटींच्या योजना अमृत महोत्सवी योजनेत जाहीर केल्या, मात्र एकट्या नांदेडचे उदाहरण घेतल्यास केवळ ३३ पैकी ३ प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. नांदेडला प्रचंड खर्च करुन विमानतळ सुरू झाले, मात्र या विमानतळावरुन कोणती विमाने जातात व येतात हेच कळत नाही, असा टोमणाही त्यांनी लगावला. आता गावागावात हे आंदोलन पेटणार असून, ज्या घोषणा झाल्या त्याची पुर्तताच तुम्हाला करत येत नसेल तर तुमसे ना हो पायेगा असेच आता म्हणावे लागेल. मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे, मात्र हे संवेदनशिल सरकार काहीच करत नाही. यामुळे संघर्षाची भूमी असलेल्या या मराठवाड्यातून ठिंणगी पेटली जाईल आणि हे आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नामर्द सरकारचा समाचार घेताना गद्दारांच्याही भूमिकेचा खरपूस समाचार घेवून कुठे आहेत ते गद्दार, गांडू द बॉस कुठे लपून बसले आहेत, यांची आता फजिती होणार हे आता स्पष्ट झाले असून, हे सरकार आता जाण्याची वेळ आली आहे, असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला.
म्हणे हेलिकॅप्टरचा कारखाना येणार, राऊतांची टिका
दावोसवरुन आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नांदेडला हेलिकॅप्टरच्या सुट्या भागाचा कारखाना सुरू होणार अशी घोषणा केली. यामुळे आता हसावे की रडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. साडेपाच हजार कोटी रुपये यासाठी मंजूर झाले, असे सांगतात, मात्र यावर मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांत मतभेद आहेत, बेरोजगारीचा भष्मासूर युवकांना सतावतो आहे, हेलिकॅप्टरच्या कारखान्याऐवजी सायकल, ट्रॅक्टर, स्कूटरचे कारखाने उभारायला हवे होते ज्यातून या भागातील पाच हजार युवकांना रोजगार मिळाला असता, मात्र ५०-५० कोटी रुपये खर्च करुन आमदार खरेदीला पैसे उपलब्ध करुन देणार्या या सरकारकडे उद्योग उभारणीसाठी पैसे नाहीत, केवळ थापेबाज सरकार आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी लातूरच्या रेल्वे बोगीच्या कारखान्याचा शुभारंभ केला. मात्र या कारखान्यातून या भागातील किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील किती जणांना रोजगार मिळाला, या प्रकल्पातून किती बोगीची निर्मिती झाली हे आता केंद्र व राज्य सरकारमधील नेत्यांनी सांगितले पाहिजे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी मारला. हे थापेबाज सरकार आहे, राज्यातील मंत्र्यापासून ते गावपातळीवरील नेत्यापर्यंत सर्वच जण थापा मारतात, प्रत्यक्षात मात्र कुठलीच कारवाई करत नाहीत. ना कुठल्या योजना पूर्ण करत नाहीत, केवळ हिंदू खतरे मै है म्हणून लोकांना भावनिक करण्याचा उद्योग हि भाजपाची मंडळी करत असून या कावेबाजांना धडा शिकविण्याची वेळी आली आहे, असेही दानवे म्हणाले.
यावेळी शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सचिन पाटील चर्हाटे, पुरुषोत्तम धोंडगे, भुजंग पाटील, बबनराव बारसे, आमदार प्रविण स्वामी, आमदार राहुल पाटील, महानगरप्रमुख प्रकाश मारावार आदींनी यावेळी आपले विचार मांडले.
यावेळी शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख किशोर पोतदार, भोकर-हदगाव-हिमायतनगर विधानसभा संपर्कप्रमुख सचिन पाटील चर्हाटे, सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, आ. प्रवीण स्वामी, आ.डॉ. राहुल पाटील, माजी आमदार अनुसयाताई खेडकर, धोंडू पाटील, तालुकाप्रमुख नांदेड उत्तर सुनिल पाटील कदम, युवासेना विभागीय सचिव महेश खेडकर, पुरुषोत्तम धोंडगे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, उपजिल्ह्रापमुख विजय बगाटे, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, उपजिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, महानगरप्रमुख दक्षिण मनोज यादव, रामचंद्र रेड्डी, गणेश गिरी, संजय ढेपे, गणेश कुंटेवार, प्रवक्ता डॉ. बालाजी पेनूरकर, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, पिंटू सुनपे, युवासेनेचे सचिन पाटील, सिडको शहरप्रमुख जितुसिंग टाक, पद्माकर सावंत, भालचंद्र नाईक, संतोष कल्याणकर, गणेश हरकरे, वत्सलाताई पुयड, गणेश पेन्सलवार, नवनाथ जोगदंड, पिंटू पाटील वासरीकर, दिलीप घुगे, विजय कल्याणकर, श्यामराव चव्हाण, निवृत्ती जिंकलवाड, बाबुराव मोरे, विश्वंभर पवार, सतीश पाटील उमरेकर, स. नवज्योतसिंग गाडीवाले आदी उपस्थित होते.
Comments are closed.