जो रूटने सचिन तेंडुलकरचा 13 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला! ठरला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक…..

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूट नेतृत्वाबरोबर फलंदाजीतही कमाल करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली आणि त्याचबरोबर रूटने दिग्गज सचिन तेंडुलकरचा जागतिक विक्रम मागे टाकला.
एजबस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य मिळाले होते. रूटने दुसऱ्या डावात नाबाद 62 धावा केल्या. याबरोबरच त्याने जॉर्डन कॉक्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघांनी 128 धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडने हा सामना 8 विकेट्सने सहज जिंकला.
जो रूटकडून सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम उद्ध्वस्त
रूटने सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडला आहे. इंग्लंडच्या फलंदाजाने शनिवारी (12 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 69 वी अर्धशतकी खेळी होती. यामुळे तो क्रिकेटच्या या दीर्घ प्रकारामध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा खेळाडू ठरला आहे.
सचिनने कसोटीमध्ये 68 अर्धशतके केली आहेत. शेवटचे अर्धशतक त्याने त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या (2013) कसोटी सामन्यात केले होते. सचिनने 200 तर रूटने आतापर्यंत 168 कसोटी सामने खेळले आहेत.
तसेच सर्वाधिक कसोटी अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल आहे. त्याने 66 कसोटी अर्धशतके केली आहेत. चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज ॲलन बॉर्डर (63), पाचव्या स्थानी माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (63) आणि सहाव्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग (62) आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके (पुरुष)
69* – जो रूट (इंग्लंड)
68 – सचिन तेंडुलकर (भारत)
66 – शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज)
६३ – ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
63 – राहुल द्रविड (भारत)
62 – रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
(जो रूटने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला, कसोटी क्रिकेट ENGvsPAK 3ऱ्या कसोटीत सर्वाधिक अर्धशतक ठोकले)
Comments are closed.