इस्रायली पंतप्रधानांच्या मेकअपवर 4 कोटी खर्च, तीन महिन्यांत केसांवर 22 लाख उडवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या स्टायलिंग आणि मेकअपवर 2019 ते 2026 या कालावधीत जवळपास 4.7 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 4 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती सरकारी नोंदीतून समोर आली आहे. नुसत्या केसांवर अवघ्या तीन महिन्यांत 22 लाख रुपये उडवण्यात आले आहेत.

डिसेंबर 2025 मध्ये कील यारा विंकलर-शलित यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून या खर्चाचा तपशील मागवला होता. त्यानंतर कार्यालयाने वेगवेगळ्या वर्षांत आणि महिन्यांत झालेल्या खर्चाची माहिती जारी केली. हेअर स्टायलिंग आणि मेकअपवर झालेल्या एकूण खर्चापैकी जवळपास 90 टक्के हिस्सा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांच्याशी संबंधित होता. मात्र, पंतप्रधानांच्या वैयक्तिक हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्टची नावे अनेक कागदपत्रांमधून वगळण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने यामागे ‘राज्याची सुरक्षा’ हे कारण दिले. इस्रायल-हमास युद्ध सुरू होण्याच्या आसपासच्या महिन्यांचा खर्च देखील रेकॉर्डमध्ये समाविष्ट आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर 2023 दरम्यान पंतप्रधानांच्या केसांच्या स्टायलिंगवर जवळपास 2,600 डॉलर म्हणजेच 22 लाख रुपये आणि मेकअपवर सुमारे 1,580 डॉलर म्हणजेच 13 लाख रुपये खर्च झाले.

Comments are closed.