काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वभूषण मिश्रा यांची बदली

वाराणसी:

श्री काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वभूषण मिश्र यांची बदली करण्यात आली आहे. मिश्र यांना उत्तरप्रदेश सेवा निवड आयोगाच्या उपसचिवपदाची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विश्वभूषण मिश्र यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी मंदिराच्या सीईओचा पदभार स्वीकारला होता. अडीच वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत त्यांनी या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सांभाळली होती.

स्वत:च्या कार्यकाळादरम्यान विश्वभूषण मिश्र यांनी काशी विश्वनाथ धाममध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुविधा आणि व्यवस्थांना सुधारण्यावर विशेष लक्ष दिले होते. त्यांच्या नेतृत्वात वायू प्रदूषणापासून बचावासाठी धाम परिसरात एअर फिल्टर लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंदिराच्या व्यवस्था आणि भाविकांच्या सुविधांशी निगडित अनेक अनय कार्यांवरून त्यांच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आले होते.

Comments are closed.