Asian Games 2026: भारताची 10 सुवर्णपदके पक्की! ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games) जपानमधील ऐची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान खेळले जाणार आहे. या स्पर्धेत भारताच्या मोहिमेची सुरूवात 17 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारताच्या एकूण 508 खेळाडू सहभागी होत आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा संघ ऍथलेटिक्सचा असून त्यानंतर हॉकी, क्रिकेट आणि शूटिंगचा क्रमांक लागतो.
यंदाच्या स्पर्धेत भारताचे आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचे ध्येय असेल. 2022 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 28 सुवर्ण पदकांसह एकूण 106 पदके जिंकली होती. या कामगिरीमुळे भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी होता. आगामी स्पर्धेत कोणाकडून पदकांची अपेक्षा आहे, हे जाणून घेऊ.
भारताचे पुरुष आणि महिला क्रिकेट संघ गतविजेते असून यावर्षीही ते सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार आहेत. त्याचबरोबर आणखी दहा खेळाडूंकडून सुवर्णकामगिरीची अपेक्षा आहे.
दोन वेळेची ऑलिम्पिक विजेती आणि माजी विश्वविजेती पीव्ही सिंधूकडून पुन्हा एकदा मोठ्या आशा आहे. ती भारताची महिला एकेरीतील स्टार बॅडमिंटनपटू असून तिने अनेक उत्तम कामगिऱ्या केल्या आहेत.
बॅडमिंटनमध्येच लक्ष्य सेनकडूनही सुवर्णकामगिरीची अपेक्षा आहे. त्याने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. त्याचबरोबर त्याने त्याच वर्षी थॉमस कपच्या विजयातही लक्षवेधी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती.
सुरेखा ज्योती ही कंपाऊंड तिरंदाजीमधील भारताच्या सर्वात प्रबळ वैयक्तिक सुवर्णपदकाच्या आशांपैकी एक आहे. तिने 2022 च्या हांगझू येथे तीन सुवर्णपदके जिंकली होती.
तिरंदाजीमध्ये आणखी एका पदकाची आशा, धीरज. तो तिरंदाजी विश्वचषक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. त्याने 2026 मध्ये अंताल्या विश्वचषकात सुवर्ण पदक जिंकले होते. त्याने असाच फॉर्म कायम राखला तर तो आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकण्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाद मनू भाकरकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची आशा आहे. ती स्वतंत्र भारतातील एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
टोकियो ऑलिम्पिकची रौप्यविजेती आणि राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणारी वेटलिफ्टर मीराबाई चानूचे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचे लक्ष्य आहे. ती 49 किलो वजनी गटात स्पर्धा करेल.
भारताला कुस्तीमध्ये सुजीत कालकलकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची आशा आहे. 65 किलो वजनी गटात स्पर्धा करणाऱ्या या कुस्तीपटूने कामगिरीत सातत्य राखत जगातील क्रमांक 1 म्हणून आपले स्थान निर्माण केले.
पॅरिस ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता, अमनकडून यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णकामगिरीची अपेक्षा आहे. तसेच ऍथलेटिक्समध्ये स्टीपलचेजर अविनाश साबळेकडून पदकाची आशा आहे. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
शूटींगमध्ये ईशा सिंग जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 21 वर्षीय ईशा महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने हांगझू येथे दोन वैयक्तिक रौप्य आणि एक सांघिक सुवर्णपदक जिंकले होते. (2026 Asian Games: Indian athletes—alongside PV Sindhu and Manu Bhaker—who could win gold medals)
Comments are closed.