कोट्यवधींचा चुराडा करूनही ठाणेकरांच्या जीवाशी खेळ; वर्षभरातच कासारवडवली पुलाला तडे अधिकाऱ्यांची पळापळ, वाहतूक बंद फ्लायओव्हरच्या जॉइंटमध्ये भेगा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अवघ्या वर्षभरापूर्वी द्घाटन झालेल्या कासारवडवली पुलाला तडे गेले आहेत. या लायओव्हरच्या जॉइंटमधील काँक्रीटला भेगा पडून तो कधीही नखळेल, अशी भयंकर अवस्था आहे. सर्व्हिस रोडने जाणाऱ्या काही सूज्ञ वाहनचालकांनी याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला असून व्हिडीओ पाहणाऱ्यांचे डोळेच पांढरे झाले. अवजड वाहने जाताना हा पूल जॉइंटमध्ये अक्षरशः जोरजोरात कप पावत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. चामुळे अधिकाऱ्यांची पळापळ झाली आहे. त्यामुळे घाईघाईने पासणीच्या नावाखाली हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला बाहे. दरम्यान कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही प्रवाशांच्या जीवाशी ळ सुरू असल्याने ठाणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

घोडबंदर रोडवरील कासारवडवली, आनंदनगर, ब्रह्मांड, वाघबीळ या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी हिली आहेत. त्यामुळे या भागातील वाहतुकीचा चंड भार वाढला असून या भागातील नागरिकांना रोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. नातच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कोंडीत आणखी भर पडत असल्याने ही समस्या कमी करण्यासाठी एमएमआरडीएने वर्षभरापूर्वी कासारवडवली येथे उड्डाणपूल उभारण्याला होता. या पुलाचे उ‌द्घाटन ८ जुलै २०२५ ला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र आता हा पूल धोकादायक अवस्थेत असून पुलाला भेगा पडल्या असल्याचे फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत. तसेच एखादे अवजड वाहन पुलावरून जाताना पूल हलत असल्याचा आरोप काही जागरूक नागरिकांनी केला आहे. या उड्डाणपुलाच्या संरक्षण कठड्याजवळील काही भागामध्ये त्रुटी असल्याच्या तक्रार एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.

काम होईपर्यंत वाहतूक बंद
ठाणेकरांनी केलेल्या तक्रारीनंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी घटनास्थळी धाव घेत उड्डाणपुलाची पाहणी सुरू केली. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याची सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. तपासणीसाठी आज रात्री ११ नंतर काम पूर्ण होईपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

ऐन गणेशोत्सवात कोंडी
उड्डाणपुलावरून जाणारी वाहने वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम ऐन गणेशोत्सवात घोडबंदर मार्गावरील वाहतुकीवर होणार आहे. वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

Comments are closed.