Sangameshwar News – भातपीक बहरण्यापूर्वी पाऊस जाण्याचे संकेत मिळाल्याने शेतकरी चिंतेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबर पासून सुरु होणार असून १५ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण हिंदुस्थानातून मान्सून माघरी जात असल्याची माहिती नुकतीच हवामान खात्याने दिली. त्यामुळे भात पीक पसवण्यापूर्वीच मान्सून निघाला असल्याने संगमेश्वर तालुक्यातील बहुतांश भागात शेतकरी हवालदील झाला आहे.

एकीकडे उशिरा सुरु झालेल्या मान्सून मुळे भात लावण्या खूप उशिराने झाल्या. दरवर्षीच्या तुलनेत १५ ते २० दिवस लावण्या उशिरा झाल्या.त्यामुळे भातपीक पसवण्याचा कालावधी देखील पुढे सरकला. यामध्ये यावर्षीच्या कमी पावसाच्या अंदाजाची माहिती जाणून घेऊन कमी कालावधीत तयार होणारी भात शेती ज्या शेतकऱ्यांनी केली. टी भातशेती चांगली पसवली आहे व काही दिवसातच परिपक्व होणार आहे. पसवलेल्या भातशेतीला परती चा पाऊस मुबलक होऊ शकतो अशी स्थिती आहे.

परंतु ज्या शेतकऱ्यांनी महान भातबियाण्याचा वापर केला आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतात अजून भात पसवण्यास सुरवात झालेली नाही. भात पासवण्याच्या वेळी पडणारा अतिरिक्त पाऊस देखील, पोल अधिक होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे महान शेती पसवण्याची वेळ आणि परतीच्या पावसाचा तडाखा यामुळे सध्या महान भातशेती एकूणच धोक्यात आहे. दुपारी पडणारे कडक ऊन, आणि रात्री दवाने ओली होणारी भातशेती, यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव होउ शकतो.शिवाय करपा रोगाचे सावट हळव्या भातशेतीवर घोंगावत आहे.

दरवर्षी शेवटा पर्यत पाऊस बरसत असल्याने, कापणी वेळी पीक भिजते.त्यामुळे बहुतांश शेतकरी वर्ग महान अर्थान जास्त कालावधीनंतर तयार होणारे बियाणे वापरते.आता योग्य पावसाची प्रतीक्षा करण्याविना शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसल्यांची स्थिती आहे.

यंदा मोसमी पावसाच्या पूर्ण हंगामावर प्रशांत महासागरातील ‘अल निनो’ चा प्रभाव आहे.त्यामुळे पावसाचे प्रमाण सर्वत्र असमान असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.जी परिस्थिती संगमेश्वर तालुक्यात आहे. तिच परिस्थिती साधारण कोकणात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात तांदूळा सह अन्य गोष्टी महाग होण्याची चिन्हे आहेत.

Comments are closed.