Pandharpur News – श्री गौरी आगमननिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस व महालक्ष्मी मातेस पारंपरिक अलंकार परिधान
श्री गौरी आगमन निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस व महालक्ष्मी मातेस आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. पारंपरिक अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे महालक्ष्मी मातेचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
श्री विठ्ठलास श्री विठ्ठलाकडे सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मनी, दंडपेठ्या जोड, हिऱ्याचे कंगनजोड, इमिटेशन नाम, मोत्याचा तुरा, मोत्याची कंटी एक पदरी, मोठ्याची कंठी दोन पदरी, इमिटेशन नेकलेस मारवाडी पेठयांचा मोत्यांचा हार, शिरपेच मोठा, मत्स्य जोड, मोहारांची माळ, पुतळ्यांची माळ, अष्टपैलू मण्याची कंठी तीन पदरी, तोडे जोड, तुळशीची माळ एक पदरी, बोरमाळ तीन पदरी आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच रुक्मिणी मातेस सोन्याचे मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पथक, जावेच्या माळा ,लक्ष्मी हार, मोरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. तसेच लक्ष्मी मातेस सोन्याचे गंठण, तांदळया हार सात पदरी, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, लक्ष्मी लॉकेट पदकासह, जवेची माळ इत्यादी सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
या अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिकच मनोहारी व भक्तिमय दिसत असून, भाविकांमध्ये या अलंकारांचे विशेष आकर्षण पाहायला मिळत असले बाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
Comments are closed.