एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी सर्वंकष रोडमॅप आणि ब्लू प्रिंट तयार करण्यात येणार असून परीक्षा ऑफलाईनच होतील, असे यासंदर्भात नेमलेल्या उच्चस्तरीय समितीकडून आज स्पष्ट करण्यात आले.

एमपीएससी परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने आज नागपूर विभागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी 200हून अधिक विद्यार्थ्यांनी समितीसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी निवेदने व सूचना मांडल्या. त्यानंतर समितीने प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातून समितीला सुमारे 18 हजार ई-मेल्स प्राप्त झाले असून सर्वाधिक प्रतिसाद नागपूर विभागातून मिळाला आहे. नागपुरातून तब्बल 7600 ई-मेल्स, तर या पूर्वी पुण्यातून 600 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सुमारे 4500 ई-मेल्स पाठवले होते. आगामी काळात उर्वरित सर्व महसुली विभागांमध्ये जाऊन समिती विद्यार्थ्यांशी असाच थेट संवाद साधणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या व सूचना

परीक्षा पद्धतीत किमान 5 वर्षे तरी सातत्य ठेवा, परीक्षेचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करा, त्रुटीमुक्त उत्तरतालिका प्रसिद्ध करा, उत्तरपित्रका तपासणीसाठी 2 तज्ञ नेमा, विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करा, निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना तीन महिन्यांत नियुक्त्या द्या, अशा सूचना या वेळी विद्यार्थ्यांनी समितीसमोर मांडल्या.

Comments are closed.