मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात ‘बर्निंग कार’चा थरार, सुदैवाने जीवितहानी टळली
मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात शनिवारी सकाळी एका धावत्या कारला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केल्याने संपूर्ण कार बेचिराख झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना वाकेड घाटात अचानक कारमधून धूर निघू लागला. प्रसंगावधान राखून चालक आणि प्रवाशांनी तातडीने कार बाजूला थांबवून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रणात आणली. कारला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत
मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात शनिवारी सकाळी एका धावत्या कारला भीषण आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. pic.twitter.com/zor3nisKUA
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 19 सप्टेंबर 2026
Comments are closed.