Ratnagiri News – गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या; रत्नागिरीत गाजत गौरी गणपतीचे विसर्जन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला… मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात आज गौरी गणपतीला भावपूर्ण श्रद्धांजली त्याला निरोप देण्यात आला.रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी दुपारनंतर भाविकांची गरज जमली होती. वाचत-गाजत गणपती बाप्पाची मिरवणूक मांडवी समुद्रकिनारी दिशेने निघाल्या ढोल ताशाचा गजर लेझीम पथक आणि फटाक्यांच्या आकाशवाणी करत जल्लोष मी वातावरणात रत्नागिरीत गणपती बाप्पाचे विसरण करण्यात आले.आज रत्नागिरी एक लाख 14 हजार घरगुती गणपती आणि 14 सार्वजनिक गणपतीचे विसरण करण्यात आले.

सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालं. घरोघरी मंगलमय वातावरणात गेले सहा दिवस गणपती बाप्पाची पूजाअर्चा करण्यात आली. गुरुवारी दुपारी वाजत गाजत गौराईचे आगमन झाले.शुक्रवारी गौराई ची पूजा करण्यात आली.अनेक ठिकाणी गौराईचा सण साजरा करण्यात आलां
आज शनिवारी वाजत गाजत गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दुपारनंतर विसर्जनाची मिरवणूक निघाल्या ढोल ताशांचा गजर आणि गुलाल उधळत मिरवणुका मांडवी समुद्र दिशेने निघाला होत्या.यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच मिरवणुका सुरळीत पार पाडाव्यात याकरता नेहमीच्या रहदारीचा मार्ग बदलण्यात आला होतांगणपती बाप्पाचे विसरून पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केली होतीं रात्री उशिरापर्यंत गणपती बाप्पांचे विसर्जन सुरू होते. रत्नागिरी नगर परिषदेने पर्यावरण रक्षणासाठी मांडवी समृद्धी नारी निर्माण गोळ्या काढायची व्यवस्था केली होती तसेच पीओपी गणपतीच्या विसर्जनांसाठी जयस्तंभ येथील उद्यानात कृत्रिम तलाव उभारला होता.

दापोली तालुक्यात काही ठिकाणी समुद्राच्या पाण्यात काही ठिकाणी नदीपात्रातील डोहात काही ठिकाणी त्यांमध्ये तर काही ठिकाणी विहीरींमध्ये विसर्जन केले जाते. गावा गावात पाण्याच्या सोयीच्या उपलब्धे नुसार गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात येते तसे शनिवारी दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील अमृतेश्वर मंदिराच्या विहीरीत गिम्हवणे गावातील आझाद वाडी , उगवत वाडी तसेच सुतारवाडी येथील गणपतींचे विसर्जन करण्यात आले तर अमृतेश्वर मंदिराच्या समोरुनच वाहणा-या नदीच्या पात्रात गौराईंचे विसर्जन करण्यात आले.

Comments are closed.