ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

‘टीएमसी’चे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका : सोमवारी सुनावणी अपेक्षित

वृत्तसंस्था/ कोलकाता, नवी दिल्ली

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि तिच्या बंडखोर गटाचे म्हणणे ऐकल्यानंतर, निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय होईपर्यंत तृणमूल काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. यानंतर, आता ममता बॅनर्जी यांनी ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ अशी नवी ओळख मिळाली आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना अनुक्रमे ‘फुटबॉलपटू’ आणि ‘लिफाफा’ ही चिन्हे दिली आहेत.

तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि पक्षातील वर्चस्वावरून ममता बॅनर्जी गट व ऋतब्रत बॅनर्जी गट यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदांच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. पक्षात सध्या दोन प्रतिस्पर्धी गट अस्तित्वात असून, दोन्ही गट स्वत:लाच खरी टीएमसी असल्याचा दावा करत आहेत. पश्चिम बंगालमधील आगामी नंदीग्राम आणि राजनगर पोटनिवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आदेश, 1968 च्या कलम 15 अंतर्गत हे अंतरिम पाऊल उचलले. आयोगाच्या मते, निवडणुकांपूर्वी दोन्ही पक्षांच्या दाव्यांवर पूर्णपणे निर्णय देणे शक्य नव्हते, त्यामुळे निष्पक्षता राखण्यासाठी टीएमसीचे नाव आणि ‘फूल-गवत’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले.

21 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता

भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी टीएमसीचे मूळ नाव आणि चिन्हाच्या वापरावर बंदी घातली. आता ममता बॅनर्जी यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्यासाठी सोमवार, 21 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही याचिका ठेवली जाण्याची शक्यता आहे. पर्यायी चिन्हे देणे हे केवळ पोटनिवडणुकीची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी असून आयोगाचा निर्णय स्वीकारला आहे असा लावू नये. आम्ही आमचा कायदेशीर लढा सुरूच ठेवणार आहोत, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.