भाजप नेते रवनीत बिट्टू पोलिसांच्या ताब्यात.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी-टोमॅटो फेकल्याप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था /लुधियाना
पंजाबमधील लुधियाना येथे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्याबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी रवनीत सिंग बिट्टू यांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना नजरकैदेत ठेवल्याच्या घटनेमुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप आक्रमक भूमिका घेत आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांचा ताफा पंजाब कृषी विद्यापीठाच्या (पीएयू) गेटजवळून जात असताना आंदोलन केल्यामुळे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू यांना शनिवारी पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले. बिट्टू यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याकडे दारूची बाटली पुढे करतानाच टोमॅटोही फेकले होते. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
Comments are closed.