19 गोल, एकतर्फी विजय! Asian Games मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची दमदार सुरूवात, उझबेकिस्तानचा दारुण पराभव

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये (Asian Games) रविवारी (20 सप्टेंबर) भारतीय महिला हॉकी संघाने उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला आणि आपल्या मोहिमेची धडाक्यात सुरूवात केली आहे.
गिफू प्रीफेक्चरल ग्रीन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पूल बी मधील या सामन्यात भारताकडून दीपिका सेहरावतने तब्बल आठ गोल ( (8′, 22′, 26′, 33′, 37′, 38′, 41′, 54′) केले, तर इशिका चौधरीने हॅट्ट्रीक ((11′, 42′, 54′) केली. तसेच लालरेमसियामी हमरझोटे (7′), बलजीत कौर (12′), नेहा (18′), नवनीत कौर (23′, 45′), लालथांतलुआंगी (43′, 51′) आणि साक्षी राणा (43′) यांनी इतर गोल केले.
ही स्पर्धा हॉकी संघासाठी 2028 च्या ऑलिम्पिकची पात्रता फेरी आहे. यामध्ये सुवर्ण पदक विजेत्या संघाला थेट लॉस एंजेलिसमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळेल.
भारत सध्या जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताने जागतिक क्रमवारीत 65 व्या स्थानावर असणाऱ्या उझबेकिस्तानवर सहज विजय मिळवला. (India’s 19-0 win over Uzbekistan as Indian Women’s Hockey Team Asian Games 2026)
Comments are closed.