तोतया मुन्नाभाईला गुन्हे शाखेचा कारवाईचा डोस
गुन्हे शाखेच्या युनिट 6 आणि 7 ने मानखुर्द आणि भांडुप परिसरातील तोतया मुन्नाभाईला कारवाईचा डोस दिला. दोन्ही कारवाईत पोलिसांनी 4 मुन्नाभाईंवर गुन्हा नोंद केला.
शनिवारी गुन्हे शाखा युनिट 7 च्या पथकाने भांडुपच्या एल.बी.एस. रोड येथील संतोष हेल्थ क्लिनिकवर पोलिसांनी छापा मारला. तेव्हा मोहम्मद अन्वर मोहम्मद अस्लम आणि मोहम्मद नबी हुसेन मोहम्मद फरीद शेख हे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. तसेच मुलुंड गोरेगाव लिंक रोड सोनापूर भांडुप येथे इमरान अब्दुल जबार खान हा बेकायदा विनायक हेल्थ क्लिनिक चालवत असल्याचे आढळून आले. त्या तिघांच्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाला मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात एक बोगस डॉक्टर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एक बनावट पेशन्ट डॉ. निहाल शराफत हुसेन याच्या समर आयुर्वेद या दवाखान्यात पाठवला. पोलीस त्या दवाखान्यात गेले. तेथे गेल्यावर पोलिसांनी निहालकडे कागदपत्रांची तपासणी केली. त्याच्याकडे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे आढळले. याप्रकरणी निहालविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सीएच्या घरी दागिन्यांची चोरी
सीएच्या घरी पावणेसोळा लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मोलकरणीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार यांच्या घरी पर्युषणनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याच्या पत्नीला कपाटातील ज्वेलरीचा बॉक्स अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा ती मोलकरीण ही संशयास्पद वावरताना दिसली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
Comments are closed.