रोहितच्या आधी बुमराहवरून BCCI-आगरकरांत वाद! कर्णधारपदाच्या निर्णयावरून मतभेद, 30 पेक्षा कमी सामने खेळलेल्या…

अजित आगरकर लवकरच भारतीय क्रिकेटच्या मुख्य निवडकर्ता पदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्याबाबत अनेक नवे आणि वादग्रस्त खुलासे समोर येत आहेत. रोहित शर्मावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी झालेले मतभेद हे आगरकर यांच्या राजीनाम्यामागचे कारण सांगितले जात आहे, मात्र खरा वाद जसप्रीत बुमराहच्या बाबतीत होता.
आगरकर हे 2023 मध्ये मुख्य निवडकर्ता बनले. त्यानंतर ते दुसऱ्याच बैठकीत उपस्थित राहिले आणि अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. ऋतुराज गायकवाड आणि जसप्रीत बुमराह यांच्या नेतृत्वपदाच्या निवडीबाबत BCCI प्रशासन आणि आगरकर समोरा-समोर आले होते.
नेमका बुमराह-गायकवाड प्रकरण काय?
झाले असे की, 2023 मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑगस्टमध्ये आयर्लंड दौऱ्यावर जाणार होता आणि त्याच्या पुढच्याच महिन्यात आशिया चषक होणार होता. त्यावेळी आगरकारांची इच्छा होती की ऋतुराजने नेतृत्व करावे, मात्र याला बीसीसीआयने विरोध केला होता.
तेव्हा भारतीय मंडळाला कर्णधारपदी बुमराह हवा होता, जो जवळपास वर्षभराच्या विश्रांतीनंतर संघात परतत होता. तसेच त्याचवर्षी ऋतुराजला आशियाई खेळाच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्याला भविष्यात भारताचे नेतृत्वही मिळाले असते.
आगरकरांनी तेव्हा असा युक्तिवाद केला की, बुमराहवर अधिक दबाव टाकला जाऊ नये. त्यामुळे त्याच्या कामाच्या भारावर परिणाम होईल. याकडे बीसीसीआयने दुर्लक्ष केले आणि अखेर बुमराहला नेतृत्वाची जबाबदारी सोपवली.
बुमराहला नेतृत्वात रस होता, यामुळे तो निर्णय घेण्यात आला असे बीसीसीआयने सांगितले होते. तेव्हा भारताने बुमराहच्या नेतृत्वाखाली आयर्लंडविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने जिंकली. त्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला.
बीसीसीआयने काढले की, आगरकर स्वत:च पद सोडणार?
आगरकर यांची मुख्य निवडकर्ता पदावरून हटवल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयने अद्याप केलेली नाही, मात्र आता आगरकर या पदावर राहणार नाहीत, हे जवळपास निश्चित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय हे आगरकर यांना मुदतवाढ देण्याच्या बाजूने नाहीत.
आगरकर यांची अधिक चर्चा रोहित शर्माच्या लॉर्ड्सवरील शतकाने सुरू झाली. तेव्हा बोर्डाने एक निवेदन जाहीर केले. निवड समितीने रोहितला कळवले होते की, त्याच्या भविष्यातील योजनांमध्ये समावेश केला जाणार नाही. दरम्यान रोहितने लॉर्ड्सवर ऐतिहासिक शतकी खेळी केली आणि अनेक अफवांना जोर धरला. तेव्हा बीसीसीआयने हस्तक्षेप केला होता. त्यानंतर आगरकर यांनी बोर्डाला कळवले की त्यांना मुख्य निवडकर्ता म्हणून मुदतवाढ नको आहे. (Ajit Agarkar and BCCI dispute Jasprit Bumrah and RutuRaj Gaikwad Captaincy)
Comments are closed.