Pandharpur News – विठ्ठल मंदिर तीन दिवस दर्शनासाठी बंद, श्रींच्या मुर्तीवर वज्रलेप प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीचे जतन व संवर्धन करण्याच्या कामासाठी 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान तीन दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुखदर्शनासह पदस्पर्श दर्शनही बंद राहणार आहे. मंगळवारी रात्री शेजारती झाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुर्ती संवर्धनाचे काम करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे उप अधिक्षक डॉ.एस. विनोद कुमार, राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार प्रतिनिधी, मंदिर समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत काम करण्यात येणार आहे.

वज्रलेप प्रक्रिया पूर्ण होताच 26 सप्टेंबरपासून दर्शन पूर्ववत सुरू राहील. वारकरी, भाविक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी केले आहे.

Comments are closed.