Asian Games 2026 – दगडफेकीतून पदकापर्यंत; फरिबाचे देशाला पहिले पदक
कधीकाळी सायकलवर बसण्यासाठीही स्वतःची ओळख लपवावी लागली होती. सराव करताना दगडफेकीचा सामना करावा लागला होता आणि आज त्याच सायकलवर पॅडल मारत अफगाणिस्तानची फरिबा हाशिमी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पोडियमवर पोहोचली. 23 वर्षीय फरिबाने महिलांच्या रोड रेसमध्ये रौप्यपदक पटकावत अफगाणिस्तानच्या सायकलिंगच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. 90.4 किलोमीटरच्या शर्यतीत चीनच्या गुओ लीसोबत फरिबाची शेवटपर्यंत चुरस रंगली. अखेर गुओ लीने सुवर्णपदक पटकावले, तर फरिबाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हे अफगाणिस्तानचे या स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले आहे.
रोड रेसमध्ये मिळवलेले हे यश फरिबासाठी केवळ एक पदक नव्हते. किशोरवयात सायकलिंगची आवड जोपासताना तिला पुरुषाचा वेष धारण करून प्रशिक्षण घ्यावे लागले होते. तिच्यावर दगडफेकही करण्यात आली. अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे अखेर तिने देश सोडला आणि आता ती इटलीत राहून प्रशिक्षण घेते. तिची बहीण युलदोज हाशिमीही व्यावसायिक सायकलपटू आहे. दोघींनी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही सहभाग घेतला होता.
या शर्यतीत आणखी एक गंमत म्हणजे फरिबाकडे स्वतःचा मेपॅनिकही नव्हता. सायकलची दुरुस्ती, धुलाई ही सगळे काम तिलाच करावे लागत होते. तरीही तिने नागोयाच्या रस्त्यावर यशाची सिल्व्हर राइड मारली. जपानी संघाने तिच्या सायकलसाठी जो मदतीचा हात पुढे केला, याबद्दल तिने विशेष आभार
मानले.
हे पदक अफगाण महिलांच्या जिद्दीचे प्रतीक आहे, असे सांगताना फरिबाने पुढच्या पिढीतील मुलींनी भीती न बाळगता आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे अशी आशा व्यक्त केली.
आशियाई क्रीडा स्पर्धा
पदक सारणी
देश su rou च्या ए
चीन 32 13 08 53
जपान 11 16 19 46
कोरिया 06 04 17 27
कझाकिस्तान ०६ ०१ ०५ १२
थायलंड ०४ ०१ ०१ ०६
हाँगकाँग 03 05 04 12
ताजिकिस्तान ०२ ०१ ०१ ०४
हिंदुस्थान ०१ ०४ ०२ ०७
उझबेकिस्तान ०१ ०४ ०१ ०६
चायनीज तैपेई ०१ ०३ ०५ ०९
इराण ०१ ०३ ०१ ०५
Comments are closed.