पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! दुसऱ्या नोकरीसाठी प्रशिक्षकाने दिला राजीनामा, नेदरलँड्सचा बनला हेड कोच

पाकिस्तान क्रिकेटमध्ये रोज काहीना काही धक्कादायक घडत असते. जेव्हापासून त्यांनी इंग्लंडचा दौरा केला आहे, तेव्हापासून ते अधिक चर्चेत आले आहेत. मग खेळाडूंची कामगिरी असो वा संघ व्यवस्थापकांचे निर्णय. आता त्यांच्या एका प्रशिक्षकाने दुसरे पद स्वीकारण्यासाठी राजीनामा दिल्याचे समोर येत आहे.
ऍशले नॉफके यांनी पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट सोडल्यानंतर ते नेदरलॅंड्स क्रिकेटमध्ये सामील झाले आहेत. त्यांची नेदरलॅंड्स पुरुष क्रिकेट संघाची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते दोन्ही संघाचे प्रशिक्षण करतील.
नॉफके यांचा पाकिस्तानसोबत करार जून 2027 पर्यंत होता, मात्र त्यांनी पदत्याग केला. तसेच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक शेन मॅकडरमॉट यांनीही जुलै 2026 मध्ये पाकिस्तान संघाची साथ सोडली आहे. काही महिन्यांपूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेनंतर व्हाईट-बॉल फलंदाजी प्रशिक्षक हनीफ मलिक आणि फिजिओथेरेपिस्ट क्लिफ डीकन यांनीही राजीनामा दिला आहे.
नॉफके यांनी मे 2025 मध्ये पाकिस्तानचे प्रशिक्षक पद स्वीकारले होते. आता ते नेदरलॅंड्समध्ये पद सोडणारे मुख्य प्रशिक्षक रायन कुक यांची जागी घेतील. या 49 वर्षीय खेळाडूने प्रशिक्षणाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे.
नेदरलॅंड्सचे लक्ष्य 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात स्थान मिळवणे आहे. संघाने या स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच ते 2028 च्या टी 20 विश्वचषकाच्या शर्यतीतही आहेत.
नेदरलॅंड्सने भारतात खेळल्या गेलेल्या 2023 च्या क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला होता, ज्यात त्यांनी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेला हरवले होते. त्यानंतर त्यांनी टी 20 विश्वचषक स्पर्धेत, गट फेरीत फक्त एकच सामना जिंकला होता. त्यांनी दिल्लीत नामिबियाला हरवले होते.
“मी डच पुरुष संघासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. हा एक प्रतिभावान आणि प्रेरित गट आहे, आणि त्यांचा विकास सुरू ठेवण्यास व कार्यक्रमाला पुढे नेण्यास मदत करणे हे माझे ध्येय आहे. माझी कार्यपद्धती डावपेच किंवा योजनेच्या आधी, संबंध जोडण्यापासून सुरू होते,” असे नॉफके यांनी नेदरलॅंड्स बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (Ashley Noffke Resigns Pakistan Bowling Coach becomes Netherlands men’s team head coach)
Comments are closed.