झहीर खान नाही आशिष नेहरा CSK चा मुख्य प्रशिक्षक बनणार होता! टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नई सुपर किंग्ससाठी IPL 2026 चा हंगाम एका वाईट स्वप्नासारखा होता. त्यातच गेली 18 वर्ष संघाची धुरा सांभाळणारे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी राजीनामा देत संघाची साथ सोडली. फ्लेमिंग यांच्या जागी चेन्नईने झहीर खानची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली. मात्र, याच दरम्यान टीम इंडियाचा माजी गोलंदाज आशिष नेहराच नाव चर्चेत आलं आहे. चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहराला विचारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

टीम इंडियाचा माजी गोलंदाजी रविचंद्रन अश्विनने आपल्या युट्यूब चॅनलवर दावा केला आहे की, आशिष नेहराला चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याने ऑफर नाकारली. अश्विन म्हणाला की, “मुख्य प्रशिक्षकपदासाठी अनेकांना विचारण्यात आलं. मला मिळालेल्या माहितीनुसार, आशिष नेहरालाही विचारण्यात आलं होतं. मात्र, त्याने ती ऑफर नाकारली. आशिष नेहराला गुजरात टायटन्सची साथ सोडण्याची गरज नाही, प्रशिक्षक म्हणून त्याने चांगली प्रगती केली आहे.” असं अश्विन म्हणाला आहे.

दरम्यान, आशिष नेहराच्या प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीचा विचार करता, नेहरा गुजरात टायटन्सच्या पहिल्या हंगामापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सने IPL 2022 च विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या हंगामातील संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, चेन्नईने त्यांचा पराभव केला.

Comments are closed.