घरगुती विसर्जन बनवा खास; अशी करा आकर्षक सजावट
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे हल्ली अनेकजणांचा कल असतो. त्यामुळे अनेक भक्त बाप्पाची शाडू मातीची मूर्ती, कागदाची मूर्ती घरी आणतात. या मूर्तीचं विसर्जन घरच्या घरी किंवा गॅलरीत करण्यास प्राधान्य देतात. अशावेळी विसर्जनाची बादली किंवा टब तुम्ही सजवून बाप्पाला निरोप देऊ शकता. आज आपण यासंदर्भातील काही टिप्स पाहूयात.
कापड
विसर्जनासाठी वापरला जाणारा टब, तांब्या पितळेचं भांड किंवा बादली जमिनीवर थेट न ठेवता एका पाटावर किंवा टेबलवर ठेवावी. त्याखाली लाल, पिवळे किंवा आवडीच्या रंगाचे कापड अंथरावे. मागे भिंतीवर कॉटन साडी किंवा शालू ड्रॅप करून एक सुरेख बॅकड्रॉप तयार करू शकता.
रांगोळी
टबाच्या किंवा पाटाभोवती रांगोळी काढू शकता. झेंडूची फुले आणि पानांचे तोरण टबाच्या कडेने लावता येईल. पाण्यावर गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्यास अजूनच छान दिसेल.
प्रकाशयोजना
टबाच्या चारही कोपऱ्यांवर लहान मातीचे दिवे किंवा तांब्या-पितळेच्या समय्या लावाव्यात. आजूबाजूला वॉर्म यलो फेअरी लाईट्स लावता येतील.
अशा सोप्या आणि बजेट-फ्रेंडली हॅक्सचा वापर करून विसर्जनाची जागा तुम्ही सुशोभित करू शकता.
हेही वाचा – विसर्जनानंतर उरलेले हार-फुलं फेकण्याऐवजी करा Reuse
Comments are closed.