Asian Games 2026 – हिंदुस्थानचा पदकांचा पंच, मीराबाईचे रुपेरी यश, नेमबाजीतही दोन पदके
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी हिंदुस्थानने आपल्या पदकतालिकेत पाच पदकांची भर घातली. बुधवारी हिंदुस्थानने एका रौप्यपदकासह पाच पदके जिंकून एकूण पदकसंख्या 12 वर नेली. हिंदुस्थानने आज नेमबाजी, सॉफ्ट टेनिस, वेटलिफ्टिंग आणि बॅडमिंटनमध्ये पदके जिंकली. त्यामुळे हिंदुस्थान आता दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. रोशिबिनाच्या वुशूच्या अंतिम सामन्याने सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित केल्या. पुरुष कबड्डी संघानेही उपांत्य फेरी गाठून देशाचे पदक निश्चित केले. महिला हॉकी संघाने एकतर्फी विजयासह आपले वर्चस्व कायम राखले.
हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. तिने महिलांच्या 49 किलो वजनी गटात एकूण 198 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. हे मीराबाईचे पहिले आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक आहे. यासह हिंदुस्थानने 28 वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले आहे.
हिंदुस्थानी महिलांच्या स्किट संघाने तीन दिवसांच्या पात्रता फेरीनंतर एकूण 331 गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले. हिंदुस्थानच्या पुरुष स्किट संघानेही कांस्यपदक जिंकले. अनंतजीत सिंग नरुका, मैराज अहमद खान आणि भावतेघ सिंग गिल यांच्या हिंदुस्थानी संघाने हे पदक जिंकले. जय मीनाने सॉफ्ट टेनिसमध्ये हिंदुस्थानसाठी एक ऐतिहासिक पदक जिंकले.
हिंदुस्थानच्या पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्य फेरीत चीनकडून 1-3 ने पराभूत झाला. यासह पुरुष संघाला कांस्यपदक मिळवता आले.
Comments are closed.