मिझोराममध्ये तरुणांनी जवानाची हत्या केली
आयझॉल
मिझोरमच्या कोलासिब जिल्ह्यात आसाम रेजिमेंटच्या 29 वर्षीय जवानाची रस्त्यावरील वादातून काही युवकांकडून मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. संबंधित जवान सुटीनिमित्त घरी परतत असताना हा प्रकार घडला आहे. जकारिया लाहिअत्तलुआंगा असे या मृत जवानाचे नाव आहे. जकारिया हा लेंगपुई विमानतळावरून स्वत:च्या मित्रासोबत ट्रकमधून मिझोरमच्या न्यू बुइलुम गावातील स्वत:च्या घरी जात असताना राष्ट्रीय महामार्ग-306 वर ही धक्कादायक घटना घडली आहे.
Comments are closed.