Palghar news – रबर कंपनीच्या गोदामाची भिंत कोसळली; नाश्ता करणाऱ्या 3 कामगारांचा जागीच मृत्यू, पोलीस घटनास्थळी दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विक्रमगड रस्त्यावरील टीना रबर कंपनीच्या गोदामाची भिंत अचानक कोसळून 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे कंपनीतील कामगार सकाळच्या वेळी गोदामाच्या भिंतीजवळ बसून नाश्ता करत होते. त्याच वेळी ही भिंत अचानक कोसळली. भिंतीचा मोठा ढिगारा थेट कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे तिघेही त्याखाली दबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले असून मृत कामगारांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.