लहान घरातील अंथरुण,पांघरूणासाठी स्टोरेज आयडीया
मुंबई पुण्यातील घरांच्या किंमती जरी आकाशाला भिडत असल्या तरी घरांचे आकारमान मात्र लहान होत आहे. यामुळे अशा छोटेखानी घरात इतर सामानांबरोबरच अंथरुण , पांघरूण ठेवण्यासाठीही जागा कमी पडू लागली आहे. अशावेळी काही आयडीया वापरून तुम्ही हा प्रश्न कसा सोडवू शकता ते पाहूया.
बेडच्या खाली
बेडच्या खाली अंथरुण , पांघरूण किंवा सामान ठेवण्यासाठी तुम्ही स्टोरेज करू शकता. जर तुमच्या बेडखाली आधीच स्टोरेज असेल तर तुम्ही त्याचा वापर अंथरुण पांघरून ठेवण्यासाठी करु शकता. आता बाजारात स्टोरेज बॉक्सही सहज मिळतात. त्यामुळे स्टोरेजसाठी फर्निचर बनवण्याचीही गरज नसते.
वॅक्यूम बॅग
रजाई आणि मोठ्या जाड ब्लँकेट किंवा कांबळ ठेवण्यासाठी जास्त जागा लागते. अशावेळी तुम्ही वॅक्यूम बॅग्जचा वापर करू शकता. हवा भरून या बॅग फुगवता येऊ शकतात आणि गरज असेल तेव्हा यांची हवा काढून त्या पुन्हा घडी करून कपाटात ठेवू शकता. बेडखाली, कपाटावर किंवा शेल्फखाली तुम्ही या बॅगेत सामान भरून ठेवू शकता.
कपाट
जर घर लहान असेल तर तुमच्या घरातील इंच इंच जागेचा तुम्हाला वापर करता यायला हवा. जसे की कपाट आणि सिलिंग यामध्ये बरीच जागा असते. याचाच वापर करत तुम्ही कपाटावर अंथरूण, पांघरून बॅगमध्ये भरून ती कपाटावर ठेवू शकता. त्यामुळे जमिनीवरचा पसारा तर कमी होईलच शिवाय घरात जागाही होईल.
खोड, टोपली
जुन्या वस्तूंचा पुन्हा ट्रेंड आलाय. यात होम डेकोरसह जुन्या फर्निचरचाही समावेश आहे. तुम्ही जुन्या ट्रंक आणि बास्केटमध्ये सामान भरून ते कपाटावर किंवा बेडखाली ठेवू शकता.
शेल्फ
दरवाजाच्या मागे तुम्ही शेल्फ बनवून त्यावरही स्टोरेज ठेवू शकता. ज्या अंथरूण पांघरूणाचा वापर वर्षातून एकदा होतो अशा चादर, रजई तुम्ही दरवाजावरील शेल्फमध्ये ठेवू शकता.
Comments are closed.