राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; मराठवाड्यातील सर्वाधिक 74 तालुक्यांचा समावेश, शिवसेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये अपुऱ्या पावसामुळे पिकं करपून गेली असून जनावराच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून अखेर राज्य सरकारने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

Comments are closed.