मुख्यमंत्री साहेब, आम्हाला फक्त शिक्षक द्या, आम्हाला अधिकारी व्हायचे; ऊसतोड मजुरांच्या मुलीची आर्त मागणी
बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विद्यार्थिनी शाळेत शिक्षक देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत आहेत. मुख्यमंत्री साहेब आम्ही मेहनत घेतो, तुम्ही फक्त शिकवण्यासाठी शिक्षक द्या, आम्हाला शिकायचे आहे, मोठे व्हायचे आहे, असे म्हणत स्वतः रिपोर्टिंग करत विद्यार्थिनींनी अडचणी मांडल्या आहेत.
बीड तालुक्यातील हिवरा पहाडी गावातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेत गणित, विज्ञान आणि संगणक या विषयांसाठी शिक्षक नसल्याची तक्रार करत स्वतः रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांकडे शिक्षक देण्याची मागणी केली.
आम्हाला अधिकारी व्हायचे आहे, मात्र शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. आमचे आई वडील ऊसतोडी करतात, आमचे गाव दुर्गम भागात आहे. तरी लवकरात लवकर शिक्षक द्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी व्हिडिओतून केली आहे. सध्या विद्यार्थिनींनी केलेला रिपोर्टिंगचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Comments are closed.