गुवाहाटी होमस्टेमध्ये २२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
गुवाहाटी:
आसाममधील गुवाहाटी विद्यापीठातील 22 वर्षीय विद्यार्थिनी एका होमस्टेमध्ये मृत vआढळून आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव निमिषा ठाकुरिया आहे. तर तिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आशिक अली (26 वर्षे) अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी आशिकला गराल प्राथमिक आरोग्य केंद्रातून ताब्यात घेण्यात आले, आशिकने निमिषाला वैद्यकीय तपासणीसाठी एका मित्राच्या मदतीने नेले होते. डॉक्टरांनी निमिषाला मृत घोषित केले होते. घटनेवेळी निमिषा आणि आशिक दोघेही धरपूरमध्ये होमस्टेमध्ये राहत होते. निमिषाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा आशिकने केला आहे. निमिषा आणि आशिक चालू महिन्यात 5 वेळा होमस्टेमध्ये राहिले होते, तेथे त्यांना योग्य पडताळणीशिवाय राहण्याची अनुमती देण्यात आली होती असे तपासात समोर आले आहे. निमिषाच्या मृत्यूप्रकरणी धारापूच्या रहिवाशांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून धरत निदर्शने केली आहे. तसेच याप्रकरणी सखोल तपासणीची मागणी केली आहे. ही घटना लव्ह जिहादशी निगडित असल्याचा आरोप निदर्शकांनी केला आहे.
Comments are closed.