उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती, देशात सुरू असलेला SIR चा वाद या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
मंगळवार:
२९ सप्टेंबर
११.३० वाजता
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद.
स्थळ: शिवतीर्थ,
शिवाजी पार्क pic.twitter.com/cdquehCNFW— संजय राऊत (@rautsanjay61) 28 सप्टेंबर 2026
ही पत्रकार परिषद 29 सप्टेंबर रोजी साडे अकरा वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होणार आहे.
Comments are closed.