Asian Games 2026 – तिरंदाजीत ‘गोल्ड’ची हॅटट्रिक! महिलांनंतर पुरूष संघाने चीनला धूळ चारली, सुवर्णपदकावर कोरले नाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी तिरंदाजांची दमदार कामगिरी सुरूच आहे. बुधवारी हिंदुस्थानच्या महिला तिरंदाज संघाने कंपाऊंड प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर कंपाऊंड मिश्र संघानेही सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यानंतर आता अंतिम लढतीत पुरूष संघानेही कंपाऊंड प्रकारामध्ये चीनला धूळ चारत सुवर्णपदक जिंकले.

अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या कुशल दलाल, साहिल राजेश आणि मणिरत्नम गणेश थिरुमुरू यांच्यापुढे चीनचे आव्हान होते. तीन सेटपर्यंत दोन्ही संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र अंतिम सेटपर्यंत चीनकडे एका गुणाची आघाडी होती. मात्र चीनच्या खेळाडूचा पहिलाच निशाणा चुकला आणि 8 गुणांची नोंद केल्याने हिंदुस्थानला संधी मिळाली.

हिंदुस्थान संघाने दबावाला बळी न पडता अंतिम सेटमध्ये सलग सहावेळा 10 गुणांची कमाई केली. त्यामुळे हिंदुस्थानने चीनचा 239-238 असा एका गुणाने पराभव करत सुवर्णपक जिंकले.

Comments are closed.