आशियाई खेळ 2026: मराठमोळ्या साहिल जाधवची चिकिता तानिपर्थीसह तिरंदाजीत सुवर्ण, 2028 ऑलिम्पिक पात्रता.

जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी (30 सप्टेंबर) भारताची सुवर्णमय सुरूवात झाली आहे. भारतीय तिरंदाजांनी कमालीची कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. यामधील एका संघाने तर थेट ऑलिम्पिक 2028 साठी पात्रता मिळवली आहे.

पहिले सुवर्ण पदक तर भारतीय महिला संघाने आणले. त्यांनी कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात आपले मागील स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले. त्यांनी अंतिम सामन्यात चीनचा 238-234 असा पराभव करत पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली. भारताच्या या विजयी संघात ज्योती सुरेखा वेन्नम, प्रिथिका प्रदीप आणि चिकिता तनिपार्थी यांचा समावेश होता.

त्यानंतर चिकीथा तनिपार्थी आणि साहिल जाधव या मिश्र जोडीने कोरियाचा ‘शूट-ऑफ’मध्ये (अटीतटीच्या निर्णायक फेरीत) पराभव करून सुवर्णपदक जिंकले आणि 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा कोटाही (Qualification Quota) मिळवला आहे.

भारताने उपांत्य फेरीत थायलंडचा 156-155 असा पराभव करून सुवर्णपदकाच्या सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने संयम आणि जिद्द दाखवत कोरियाच्या जुंगयून पार्क आणि चोई युन ग्यु यांच्यावर मात केली. भारताने हा सामना 158-157 अशा फरकाने जिंकला.

या प्रकारात चीनी जोडी फॅंगयाओ एफ वेई आणि जिनी लियू कांस्यपदक विजेती ठरली.

यावरून 2023 हँगझोऊ येथील मागील स्पर्धेत भारताने जिंकलेली सुवर्णपदके या दोन्ही संघांनी यशस्वीपणे कायम राखली. (Sahil Jadhav and Chikitha Taniparthi won Gold Medal in Compound Archery Mixed at Asian Games 2026)

Comments are closed.