साडीला फॉल लावणे का गरजेचे? कधीपासून सुरू झाली ही पद्धत?
महिलांच्या कपाटात कितीही कपडे असले तरी साडी नेहमीच खास असते. लग्नकार्य असो वा सण-उत्सव, साडी नेसल्यानंतर मिळणारी शोभा काही वेगळीच असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की कोणतीही नवीन साडी नेसण्यापूर्वी तिला फॉल लावणे का गरजेचे मानले जाते? आजीच्या काळापासून चालत आलेली ही पद्धत केवळ एक परंपरा नसून यामागे साडी टिकवण्याचे एक गुपित आहे. साडीला फॉल लावणे का महत्त्वाचे आहे हे समजून घेऊयात.
साडीचा पोत
साडी नेसल्यानंतर तिचा खालचा भाग सतत जमिनीला किंवा पायांना घासतो. त्यामुळे साडीचे धागे निघणे, काठ खराब होणे किंवा साडी फाटण्याची शक्यता असते. फॉल लावल्यामुळे साडीच्या खालच्या काठाला एक कव्हर मिळते, ज्यामुळे महागड्या साडी टिकते.
प्लेट्स
साडीच्या प्लेट्स व्यवस्थित बसणे हा साडीच्या लुकचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. फॉल लावल्यामुळे साडीच्या खालच्या भागाला थोडे वजन मिळते, ज्यामुळे साडीच्या चुण्या एकावर सरळ बसतात आणि साडी नीट बसते.
चालताना कम्फर्ट
फॉलमुळे साडी पायात अडकत नाही. चालताना साडीचा काठ पायात न राहता व्यवस्थित राहतो, ज्यामुळे महिलांना सहजपणे चालणे शक्य होते.
कधीपासून झाली सुरूवात?
सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार साधारण 1970 च्या दशकात साडीला फॉल लावण्याची पद्धत सुरू झाली. साडीच्या खालची किनार खराब होऊ नये हा यामागील मुख्य उद्देश होता. असं म्हणतात की, त्याआधी महिला फॉल न लावताच साड्या नेसत असत. परंतु जमिनीला किंवा पायांना घासल्यामुळे साडीचा खालचा भाग लवकर खराब होत असे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टेलर्सने विविध प्रयोग केले. त्यांनी साडीच्या काठाला इस्त्री करून व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केला पण काठ खराब होणं थांबले नाही. अखेर खूप संशोधनातून साडी फॉलचा नवा मार्ग समोर आला. साडीच्या खालच्या काठाला कापडी पट्टी जोडल्यामुळे काठाला योग्य वजन मिळाले आणि साडी खराब होण्यापासून वाचू लागली.
हेही वाचा – साडी अधिक उठून दिसेल; ट्राय करा ब्लाउजचे ट्रेंडिंग डिझाइन्स
Comments are closed.