IND Vs WI – षटकारांचा बादशहा; एकाच सामन्यात हिटमॅनचा दुहेरी धमाका, 12 हजार धावांचा टप्पाही पार
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने धुरळा उडवून दिला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 406 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. सलामीवीर रोहित आणि कर्णधार गिलने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना धुवून काढलं आहे. दोघांनी मिळून 200 धावांची भागीदारी केली असून गिलने शतक ठोकलं तर रोहित शर्माने विक्रमांना गवसणी घातलीये.
रोहित शर्माने या सामन्यात षटकार मारत 200 षटकार मारण्याचा ऐतिहासिक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने वनडे क्रिकेटमध्ये आपल्या 12,000 धावांचा टप्पा देखील पूर्ण केला आहे. 12 हजार धावा पूर्ण करणारा तो जगातील 7 वा आणि हिंदुस्थानचा तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहित आणि शुभमन गिलने संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली असून अवघ्या 22.3 षटकांचा खेळ झाला तेव्हा संघाने बिनबाद 212 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 72 चेंडूंमध्ये 118 धावांवर फलंदाजी करत आहे, तर रोहित शर्मा 66 चेंडूंमध्ये 85 धावा करत फलंदाजी करत आहे. टीम इंडियाला जिंकण्यासाठी अजूनही 194 धावांची आवश्यकता आहे.
Comments are closed.